मुंबई महापालिका, रेकॉर्ड मतदान-पवारांचे मत कुणाला याची उत्सुकता


मुंबई महानगरपालिकेसाठी काल झालेल्या मतदानात यंदा रेकॉर्ड मतदान झाले असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच या निवडणुकांत ५५ टक्के मतदान झाले असून गतवर्षी ते ४५ टक्के इतके होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या मतदारसंघात मतदान केले, तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता त्यामुळे पवारांचे मत कोणाला याची जोरदार चर्चाही रंगलेली दिसत होती. मुंबईबरोबरच पुणे, नागपूर, अशा १० महानगरपालिका व दुसर्‍या फेजमधील ११ जिल्हापरिषदा तसेच ११८ पंचायत समित्यांसाठीही काल मतदान शांततेत पार पडले.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईत भाजप व शिवसेना यांच्यात काँटे की टक्कर असेल तर पुण्यात भाजप बहुमत मिळवेल. मुंबईतील मतदानात यंदा सेलिब्रिटीनीही हजेरी लावली. अनुष्का शर्मा, रेखा, सचिन तेंडुलकर, टिना अंबानी यांनी मतदान केलेले फोटो शेअर केले तर नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता व मुख्यमंत्र्यांच्या आईंनी मतदानाचा हक्क बजावला.
पुण्यात वॉर्ड क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पैसा वाटप करत असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही समजते.

No comments:

Powered by Blogger.