शोभा डेंच्या ‘त्या’ ट्विटची मुंबई पोलिसांनी जिरवली

मुंबई – पोलीस कर्मचाऱ्यासंदर्भात लेखिका शोभा डे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला मुंबई पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून काल शोभा डे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबई पोलिसांची खिल्ली उडविणारे एक छायाचित्र ट्विट केले होते. या छायाचित्राबरोबरचा संदेश संबंधित कर्मचाऱ्यावर शारीरिक टिप्पणी करणारा होता. मात्र, मुंबई पोलिसांनी शोभा डे यांच्या ट्विटनंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. विनोद आम्हालाही आवडतात. मात्र, याठिकाणी वापरण्यात आलेला संदर्भ पूर्णपणे चुकीचा आहे. छायाचित्रातील कर्मचाऱ्याने घातलेला गणवेश हा मुंबई पोलिसांचा नाही. आम्हाला अजून चांगल्या अपेक्षा तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकाकडून आहेत, असा टोला या ट्विटमधून डे यांना लगावला आहे. शोभा डे यांना त्यानंतर अनेक ट्विटरकरांनीही प्रत्युत्तर दिल्याबद्दल मुंबई पोलिसांचे कौतूक करत त्यांना पाठिंबा दिला. मुंबई पोलीस त्यांच्या प्रतिष्ठेसाठी ठामपणे उभे राहिले, याबद्दल त्यांना सलाम, अशा प्रतिक्रियाही काही ट्विटरकरांनी व्यक्त केल्या आहेत.
Know more about => Thermosyphon system
ReplyDelete