दंड न भरल्यास शशिकलांचा कारावास वाढणार


बंगळुरू: अण्णाद्रमुक पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी कारावास भोगत आहेत. शशिकलांनी १० कोटी रुपयांचा दंड न भरल्यास त्यांच्या कारावासाच्या कालावधीत आणखी १३ महिन्यांची वाढ होणार आहे; अशी माहिती कारागृह अधीक्षक कृष्ण कुमार यांनी दिली.
अण्णाद्रमुकचे महासचिव परपन्ना अग्रहाराही सध्या तुरुंगात आहेत. उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमवल्या प्रकरणी शशिकला यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही दोषी ठरवून सर्वोच्च न्यायालयाने ४ वर्षांचा कारावास आणि १० कोटींच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
यापूर्वी शशिकलांना न्यायालयानं चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यात १० कोटींच्या दंडाची भर पडली आहे. दंड न भरल्यास त्यांना १३ महिन्यांचा कारावास वाढणार आहे. शशिकला त्यापैकी २१ दिवस कारागृहात राहिल्या आहेत. शशिकला, इलावरासी आणि सुधाकरन यांना कोणतीही विशेष सुविधा पुरवली जात नाही. सुरक्षेच्या कारणास्तव शशिकला आणि इलावरासी यांना महिला ब्लॉकमधल्या छोट्या खोलीत ठेवण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची तपासणी करीत आहेत; अशी माहितीही कारागृह अधीक्षक कृष्ण कुमार यांनी दिली.

No comments:

Powered by Blogger.